Sunday, April 18, 2010

पहिली चोरी !!!


गेल्या ५-६ महिन्यांत मराठी ब्लॉग्सच्या जगात मुक्त मुशाफिरी करताना एक लक्षात आलं की इथे एकापेक्षा एक सशक्त लेखन करणारी मंडळी आहेत. नुसतं वाचक म्हणून इथे वावरलो तरीही आपल्या साहित्यविषयक किंवा एकूणच जीवनविषयक ज्ञानात, अनुभवात खूप भर पडेल, पडते आहे. पण दुर्दैवाने लवकरच हेही लक्षात आलं की इथे असे एकसेएक भन्नाट लिहिणारे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक ते लेखन सरळ, जसंच्या तसं, मूळ लेखाचा आणि मूळ लेखकाचा साधा उल्लेखही न करता, त्यांना योग्य ते श्रेय न देता बिनदिक्कतपणे आपल्या ब्लॉगवर टाकणारे, कॉपी+पेस्ट करून इमेल मध्ये चिकटवून फॉरवर्ड करणारे आहेत. अनेक महिने वेगवेगळया अनेक ब्लॉग्सचं वाचन केल्याने (जवळपास) प्रत्येक ब्लॉगरची भिन्न, युनिक शैली, विषय, मांडणी, रचना आणि एकूणच लेखन यामुळे ते लेखन त्या त्या ब्लॉगवर न वाचता (दुर्दैवाने आणि चुकूनमाकून) इतर कुठे वाचायची वेळ आली तरी मूळ लेखक सहज ओळखता येऊ लागला. सुरुवातीला काय करावं ते न कळल्याने 'हे असं चालायचंच' असं वाटून त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्ष केलं गेलं. पण बघता बघता या गोष्टी वारंवार होतायत असं लक्षात यायला लागलं किंवा अशा बाबतीत नजर थोडी जास्तच शोधक बनल्याने अशा चोर्‍या (यापेक्षा सौम्य शब्द मला तरी माहित नाही) जास्तच चटकन दृष्टीस पडू लागल्या. आणि एक दिवस चक्क माझ्याही कवितेची दुसर्‍या एका अशी चोरी झाल्याचं लक्षात आलं. तेव्हा मग त्या ब्लॉगच्या त्या पोस्ट वर जाऊन मी आणि आपल्या ब्लॉगु-ब्लगिनींनी अनेक प्रतिक्रिया देऊन मूळ कवितेची लिंक दिली. कालांतराने त्या ब्लॉगमालकाने माफीही मागितली. पण एक लक्षात आलं की हा प्रकार आपल्या नजरेस पडला म्हणून आपण तिथे जाऊन प्रतिक्रिया देऊन आणि आपल्या मित्रांना प्रतिक्रिया द्यायला सांगून त्या ब्लॉगमालकाला त्याची चूक मान्य करायला भाग पडू शकलो. पण असे असंख्य गुणी लेखक/लेखिका असतील की ज्यांच्या लेखनाच्या रोज चोर्‍या होत असतील आणि त्या बिचार्‍यांना आपलं लिखाण दुसरा कोणीतरी परस्पर आपल्या नावावर खपवून उगाच आपलं श्रेय लाटतोय याची कल्पनाही नसेल. तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा अशा चोर्‍या नजरेस पडल्या तेव्हा तेव्हा त्या लेखाखाली जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायला लागलो. तर बयाच वेळा अशा प्रतिक्रिया दिल्यावर ते ब्लॉगमालक ती पोस्ट अपडेट करून लगेच मूळ लेखकाचं नाव आणि मूळ लेखाची लिंक द्यायला लागले. पण सगळ्यांचं कारण जवळपास एकच असे की "मला हा लेख/कविता इमेल मधून आली होती आणि तिथे मूळ लेखकाचं नाव नव्हतं." खरंतर मूळ लेख शोधणं आजच्या गुगल जमान्यात अजिबात अवघड नाही हे वेगळं सांगायला नको. असो. पण सगळेच जण असे लगेच माफी मागणारे नव्हते. याच्या उलट अनुभवही आले. चोराच्या ब्लॉगवर जाऊन तिथे त्याला मूळ लेखनाबद्दल माहिती करून देणारी प्रतिक्रिया दिली की ती प्रतिक्रिया कधी प्रकाशितच केली जायची नाही. उलट इमेल मधून धमक्या यायच्या की "या ब्लॉगवरील लेखन माझे आहे असं मी कुठेच म्हटलेलं नाही. हा ब्लॉग म्हणजे माझ्या आवडत्या लेखांचा, कवितांचा संग्रह आहे. प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करत जा."  असा उद्धटपणाआड लपलेला साळसूदपणाचा आव आणला जायचा. किंवा कधी कधी तर त्या लेखावर "वा वा ", "सुंदर..", "फारच छान.. खूप आवडलं." अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जायच्या पण मूळ लेखनाचा दुवा दिलेली प्रतिक्रिया मात्र हटकून प्रसिद्ध केली जायची नाही. हे असं झालं की संताप व्हायचा. तेव्हा मग मी अजून एक प्रकार करणं सुरु केलं. मूळ लेखकाच्या ब्लॉगच्या त्या लेखावर जाऊन त्याच्या खाली "आपला हा लेख अमुक अमुक ब्लॉगवर चोरीला गेला आहे"' असं लिहून चोरट्या ब्लॉगची लिंक द्यायचो. ही मात्रा मात्र बरेचदा काम करायची. मूळ लेखकाने चोरट्याला मेल/प्रतिक्रिया देऊन खडसावाल्यावर बरेच (सगळे नव्हे. तरीही शिरजोरी करणारेही अनेक बघितले) चोर सरळ व्हायचे आणि मग त्यांच्या ब्लॉगवरून तो लेख काढून टाकायचे. यातला एकही प्रसंग उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी दिलेला नाही. प्रत्येक चोरीचे/मेलचे/प्रतिक्रियांचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण मुद्दामच मी आत्ता इथे एकाही ब्लॉगचं, लिंकचं, लेखकाचं नाव देत नाहीये. कारण जवळपास बरीच प्रकरणं मिटलेली आहेत. तर हे असं पुन्हा पुन्हा झालेलं बघितल्यावर मात्र काहीतरी करायला हवं हा विचार डोक्यात घुमायला लागला. "आपण साधे मराठी ब्लॉगर. आपण काय करणार?" असा विचार मनात येतो ना येतो तोच त्याचं उत्तर मिळालं. आपण ब्लॉगर .. आपण काय करणार?? सोप्प आहे. आपण नवीन ब्लॉग सुरु करणार. हो हो.. नवीन पोस्ट नाही.. नवीन कोरा करकरीत ब्लॉग. कशासाठी?? तर या अशा चोर्‍या सगळ्यांसमोर याव्यात यासाठी. अशा चोर्‍या सगळ्यांसमोर आल्या की आपोआपच त्या कमी होतील. अर्थात पूर्ण नाहीशा होतील असं नाहीच. प्रमाण तरी कमी होईल. तेवढाच आपला खारीचा वाटा.
थोडक्यात काय तर जेव्हा जेव्हा आपल्याला अशी चोरी दिसेल तेव्हा आधी नेहमीप्रमाणे मूळ लेखावर जाऊन चोरीच्या लेखाची आणि चोरीच्या लेखावर जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायची. १-२ दिवस वाट बघूनही चोरीच्या ब्लॉगमालकाचं काही उत्तर आलं नाही तर ती चोरी सरळ या आपल्या नवीन ब्लॉगवर टाकायची. म्हणजे जास्तीतजास्त लोक ते वाचतील. चोरी जगजाहीर होईल आणि आपोआपच चोराला नमतं घ्यावं लागेल. यात फायदा आपल्या सगळ्यांचाच आहे. आपले अनेक लेख/कविता चोरीला जात/गेले असतील पण आता अशा चोर्‍यांवर लक्ष ठेवणारे आपण एकटेच नसू. सगळेजण मिळून हे काम करतील आणि चोरी पकडून देतील. आणि आपल्या या  संघटीत कामामुळे असे चोर आपोआपच दबकून राहतील आणि त्यामुळे कदाचित आपल्या लेखांच्या भविष्यात होऊ शकणार्‍या चोर्‍या रोखल्या जातील. अर्थात या प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यावर ठोस उपाय सध्यातरी कोणालाच माहित नाही (कोपीराईट वगैरे सगळं ठीक आहे. पण त्याच्याने हे प्रकार रोखले जातायत का या प्रश्नाचं उत्तर हो असतं तर हा ब्लॉग सुरु करायची वेळच आलिओ नसती.). पण त्यामुळे स्वस्थ बसण्यापेखा आपण स्वतः काहीतरी केल्याचं आणि हे प्रकार थोडे तरी कमी केल्याचं समाधान. आणि त्यासाठीच हा नवीन ब्लॉग सुरु करतोय. पण आधी म्हटल्याप्रमाणे हा ब्लॉग माझा एकट्याचा नाही. आपल्या सगळ्यांचा आहे. 
आणि हो.. या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागल्या नाही, तशी वेळ आली नाही तर आनंदच आहे.. नाही का? :-)
तर आजच्या चोरीचे तपशील पुढीलप्रमाणे..


आणि भाग तिसरा येतोय. म्हणजे मूळ लेखकाने बिचार्‍याने एका पोस्ट मध्ये लिहिलेल्या लेखाची ही अनेक भागांमध्ये चोरी. छान चाललंय !!!!
मी भाग-१ वर मूळ लेखाची लिंक दिली होती. पण आज बघतो तर भाग-२ सुद्धा आला. म्हणून मी भाग-१ वर जाऊन माझ्या प्रतिक्रियेला काय उत्तर दिलं आहे  हे बघायला गेलो तर तिथे माझी प्रतिक्रिया सोडून इतर सगळ्या "वा वा छान छान" वाल्या प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या आहेत. मग लक्षात आलं की "अरे चोरा, मूळ लेखक अज्ञात नसून तो तुला मुद्दाम अज्ञात ठेवायचा आहे.". पण त्याच्या दुर्दैवाने अति झालेल्या या चोरी प्रकरणांमुळे या ब्लॉगची कल्पना सुचली आणि पाहिलं अपीलही झालं. आता विकेट कधी पडते ते बघुया. मग? बघता काय? चोरीच्या लेखांवर जाऊन पाडा प्रतिक्रियांचा पाउस.

आणि आधी म्हटल्याप्रमाणे या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागू नयेत हीच सर्व चोरांना आणि देवाला प्रार्थना !! :-)

68 comments:

 1. मस्त आहे युक्ती. मला या चोरीचा अनुभव एकदा आला होता. तू म्हणालास तसा ’वाईट्ट ईमेल्स’चाही अनुभव आला. त्यानंतर आता तसं काही झालेलं नाही पण जर कुणी ब्लॉगलेखाची चोरी केली आहे, हे कळलं, की आपल्याच मूळ लेखाखाली त्या चोरटयाच्या ब्लॉगची लिंक देणार आहे. धन्यवाद.

  ReplyDelete
 2. आभार कांचन. आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं तर अशा चोर्‍या नक्कीच थांबवता येतील.

  ReplyDelete
 3. वाह हेरंब, अश्या ऑनलाइन चोरीला थोडा आळा बसेल अशी अपेक्षा करूया. छान कल्पना आहे ब्लॉग सुरू करण्या मागची. आमची साथ आहे तुला.

  ReplyDelete
 4. हो रे. खरंच रोज या अशा चोर्‍या बघून डोकं फिरायचं नुसतं. म्हटलं ब्लॉगच सुरु करून टाकू.... आपण सगळे मिळून नक्की हे प्रकार कमी करू !!!

  ReplyDelete
 5. हे चोर लेखक महाशय कोण आहेत? आणि मूळ लेखक कोण आहेत?

  ReplyDelete
 6. हा तर चोरटेपणाचा कळस आहे! दुसऱ्यांच्या पोस्ट्स चोरून काय मिळणार आहे? देवा रे... पण कल्पना चांगली आहे हेरंब. मला असलं काही सापडलं तर मी नक्की कळवीन. एक सांगायचं होतं, हाताच्या बॅकग्राऊंड इमेज मुळे अक्षर वाचायला थोडा त्रास होतो. जमल्यास थोडा बदल कर. या अभिनव उपक्रमाबद्दल अभिनंदन!

  ReplyDelete
 7. आभार विद्याधर.

  ReplyDelete
 8. अपर्णा, मूळ लेख आणि इतर दोन लिंक्सवर क्लिक करून पहा..

  ReplyDelete
 9. आभार अभिलाष.. अरे हो. बॅकग्राऊंडची गडबड माझ्याही लक्षात आली. पण काल खूप रात्र झाली होती आणि जाम झोप येत होती म्हणून म्हटलं की उद्या बदल करू. actually मला ते thumbs down असं दाखवायचं होतं. ते ही नीट दिसत नाहीये.. आज करतो डागडुजी.. आभार !!

  ReplyDelete
 10. कोण ह्यांच्या नादी लागेल. सोड रे. ही बांड्गूळ रे. दुसर्‍याच्या जिवावर जगणार हे नेहमी.

  ReplyDelete
 11. अरे खरंय.. पण आपण असंच नेहमी म्हणतो आणि असे प्रकार वाढत जातात. :-(

  ReplyDelete
 12. Gr8.... !!! Blog chi kalpana ekdam mast aahe...
  Lets fight togather.... :)

  ReplyDelete
 13. हेरंब तू तुझ्या मार्गाने अशा प्रवृत्तीबद्द्ल झगडण्याचा प्रयत्न करतोस त्यासाठी शुभेच्छा आणि काही मदत मी करु शकत असेन तर नक्कीच करेन..
  मागेही प्रसादने अशा प्रकारे एकाशी बोलुन (किंवा वादात पडून) त्या ब्लॉगरने शेवटी आपला ब्लॉग बंद केला होता त्याची आठवण झाली..फ़क्त माझं स्वतःचं मत (बाकीच्यांचे अनुभव पाहून) इतकंच आहे की अशी लोकं आपल्या आजुबाजुला असणारच. आपण काहीवेळा स्वान्त सुखाय ब्लॉगिंग केलेलं बरं...अर्थात मिळालाच कुणी असा तर त्याला जाब विचारणं आवश्यकच आहे पण तरी जीवाला इतका त्रास करुन घेऊ नये..शेवटी जो तो कुठेही खोटे बोलु शकला तरी स्वतःच्या मनाशी तरी खरेच बोलावे लागेल नं ...असो...

  ReplyDelete
 14. आभार अपर्णा.. अग आपल्या सगळ्यांनाच स्वान्त सुखाय ब्लॉगींग करता यावं यासाठीच तर चाललंय हे.

  आणि तुला एक गंमत माहित्ये? आत्मप्रौढी म्हणून सांगत नाहीये पण प्रसाद (चुरापाववाला) च्या ब्लॉग वरची चोरी मीच पकडून दिली होती. जेव्हा मला ती कविता दुसर्‍या ब्लॉगवर (चोराचं नाव ही प्रसादच होतं.)दिसली तेव्हा तिथे जाऊन मी जेव्हा कमेंट टाकली. तेव्हा त्याचा मला उद्धट रिप्लाय आला. मग मी चुरापाव वर जाऊन चोरीविषयी कमेंट टाकली आणि मग प्रसादने त्याच्याशी मेलामेली केली आणि शेवटी चुरापाव Vs चोरपांड्या अशी पोस्ट टाकली.
  http://churapaav.blogspot.com/2010/02/vs.html

  ReplyDelete
 15. मस्त रे !!
  वाटल्यास कॉन्टॅक्ट फॉर्म / फोरम सारखं एखादं पेजही टाक म्हणजे अशा चोऱ्या सापडल्यास कोणीही लिंक्स टाकू शकेल.
  आम्ही काही मदत करू शकलो तरी नक्की सांग.

  ReplyDelete
 16. अवघड आहे लेखकांचं. पण त्या अरूणोदय ने चक्क फ्री कॉपी राईट चं लेबल लावून ठेवलं आहे की ब्लॉग वर. अमित पवार (मूळ लेखकाने फ़्री कॉपी राईट केलेलं दिसत नाही!) त्या संबंधी पण ब्लॉग धारक व लेखक यांमध्ये जागृती झाली पाहिजे. पण हा उपक्रम छान आहे (चोर्‍या पकडण्याचा):-)

  ReplyDelete
 17. ग्रेट...सुंदर कल्पना आहे...माझी मदत राहीलच....

  ReplyDelete
 18. हेरंब, सहि आहेस तु! पण या ब्लॉगची संकल्पना मस्त आहे. तुझ्या भाषेत ’एकदम पटेश’

  ReplyDelete
 19. धन्यवाद हेरंब. खूप चांगला ब्लॉग.

  माझ्या दमलेल्या बाबाच्या विडंबनाची ब-याच ठिकाणी चोरी झालीये. लोकांना इमेल मधून आलं असं सांगितलंय त्यांनी. असो.
  मूळ
  http://nilyamhane.blogspot.com/2010/03/blog-post_09.html
  ऑरकुट्वर एकाने टाक्ले आहे. त्याला विचारले कुठे मिळाली कविता तर पट्ठ्या म्हणाला माझ्याकडे पहिल्यापासून होती.
  http://www.orkut.com/Main#FullProfile?rl=pcb&uid=8539071150923199025

  इथे जशास तशी पोस्ट आहे पण शेवटी नाव आहे.

  http://www.google.com/profiles/109897185443024306680#buzz


  एकाने बझवर टाकले आहे पण मूळ ब्लॉगची लिंक न देता चोरीची लिंक दिली आहे.
  http://www.google.com/profiles/109897185443024306680#buzz

  ReplyDelete
 20. नॅकोबा, कॉन्टॅक्ट फॉर्मची आयडिया छान आहे. नक्की टाकतो. तू पाठवलेलं राईट-अप पण आवडलं. त्यावर बोलूया उद्या. अजून बरेच छोटेमोठे बदल करावे लागतील ब्लॉगमध्ये. पण सुरुवात तर झाली.. खूप आभार.. !!

  ReplyDelete
 21. आभार अपर्णा (शांतीसुधा), कॉपीराईट बद्दलही जागरुकता निर्माण केली पाहिजे हेही खरंच.

  ReplyDelete
 22. आभार आनंद. तुम्हा सगळ्यांची साथ मिळणार याची खात्री होतीच.

  ReplyDelete
 23. आभार सोनाली :-). आपणच सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे हे प्रकार थांबवण्यासाठी.
  आयडिया पटेश हे वाचून छान वाटेश.. :-)

  ReplyDelete
 24. निल्या आभार.. तो बझ बघितला. अरे त्या हळदणकरला आधी पण आम्ही सगळ्यांनी अशाच चोर्‍या करताना पकडलं आहे. तेव्हाही बरीच वादावादी झाली होती. पण तरीही सुधारला नाही वाटतं. आता तुझ्या पोस्टच्या चोरीबद्दल नवीन पोस्ट टाकतो उद्या. त्यात बझची लिंक सुद्धा देईनच. आणि तुझ्याकडे त्याच्या ब्लॉगची लिंक असेल तर तीही दे मला. अजून एक पुरावा म्हणून.

  ReplyDelete
 25. blog chi link
  http://mannmajhe.blogspot.com/2010/03/very-funny-must-watch.html

  ReplyDelete
 26. निल्या, तुझा इमेल आयडी मिळू शकेल?

  ReplyDelete
 27. मित्रांनो, अखेरीस 'त्या'ला त्याच्या लेखाखाली मूळ लेखाची लिंक द्यावी लागलीच.. चला.. काहीतरी परिणाम झाला तर... इथे बघा.
  http://arunoday2010.blogspot.com/2010/04/3.html

  ReplyDelete
 28. जिकलस भावा!

  अरुणोदयनं तिन्ही पोस्टवर मूळ लेखकाची लिंक लावलीय आता. निदान acknowledge तरी केलं.

  या ब्लॉगचा उद्देश आहे साध्य होतोय असं दिसतंय.

  विवेक.

  ReplyDelete
 29. आभार विवेक. हो असं वाटतंय खरं :-) .. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच हे शक्य झालं. !!

  ReplyDelete
 30. मित्रांनो, अखेरीस त्याने ती पोस्टच काढून टाकली आहे त्याच्या ब्लॉगवरून. :-)

  ReplyDelete
 31. हे व्हायलाच हव होत...छान उपक्रम हाती घेतला आहेस..यासाठी माझ पुर्ण सहकार्य लाभेल....
  मागे मलाही माझ्या ’कणा’ या कवितेबद्दल हा अनुभव आला होता...http://gavachakatta.blogspot.com हया ब्लॉगवर ती अशीच टाकली होती वर माझी प्रतिक्रियाही जात न्वहती तिथे.माझ्या दुरावा (http://wp.me/pziD7-i7)हया अनुवादीत कवितेच्या कमेंटसमध्ये मी ह्याबद्दल लिहल होत...बरेच प्रयत्न करुन सोडुन दिली होती ती गोष्ट..मला वातते मी तुलासुदधा ही गोष्ट सांगीतली होती..असो पण आता तपासल्यावर त्या ब्लॉगवरुन ती काढलेली दिसली....

  ReplyDelete
 32. आभार देव. हो मला आठवतंय.. तू मला याबद्दल बोलला होतास मागे. सगळ्यांनाच असे अनुभव येत असतात. त्यासाठी काहीतरी करायचं म्हणून हा ब्लॉग सुरु केला. :-)

  ReplyDelete
 33. हेरंब

  ही पोस्ट ब्लॉग चोरीबद्दल नाही, त्यामुळं irrelavant वाटली तर delete करून टाका.

  आज दिवसभरातील एका घडामोडीबाबत कॉमेंट्ससहीत इथं वाचा (कदाचित तुम्ही वाचलंही असेल):
  http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2010/04/blog-post.html

  आता तर लोकसत्तानं ‘ती’ ओळच वगळून whitewash करायचा प्रयत्न केलाय. पण print editionचं काय?

  आपण सर्वजण याबद्दल काही करू शकतो का? ही गोष्टी निदर्शनास यावी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी ही कॉमेंट. हा तुमचा ब्लॉग एकाअर्थी watchdog असल्यानं इथं लिहितोय. लोकसत्तासारख्या प्रतिष्ठित दैनिकानं असं करावं हे निदान ब्लॉगविश्वात तरी सगळ्यांना कळलं पाहिजे असं मला वाटतं

  विवेक.

  ReplyDelete
 34. हो विवेक. मी नीरजा पटवर्धन यांच्या ब्लॉगवर ही बातमी वाचली काल रात्री (भारतातल्या आज सकाळी). त्यावर तुमची प्रतिक्रिया आणि तुमचा लेखही वाचला. आत्ता तुमच्या या कमेंट नंतर पुन्हा नीरजा पटवर्धन यांचा ब्लॉग पहिला आणि लोकसत्ताचा दरिद्रीपण लक्षात आला. एक छोटीशी क्षमा मागून त्यांना प्रकरण मिटवता आलं असतं. पण त्यांनी तसं ना करता बातमी बदलली. यावरून मला तरी असं वाटतंय की हा अनवधानाने झालेला प्रकार नसावा. जाणून बुजून केलेला असावा. अनवधानाने झालेला असता तर त्यांना माफी मागण्यात काहीच कमीपणा वाटायला नको खरं तर.

  नीरजा पटवर्धनांशि बोलून त्यांच्या संमतीने हा प्रकार माझ्या या ब्लॉगवर टाकतो. म्हणजे सगळ्या ब्लॉगविश्वाला कळेल.

  ReplyDelete
 35. चांगला उपक्रम आहे हेरंबजी
  यापुढे मला काही चोर्‍या आढळल्या तर कॉलर धरून तुमच्यासमोर उभं करतो :)

  मागे तुम्ही लिंक दिलीत तेव्हा वाटलं या चोराला एक मेल टाकला की काम झालं
  पण तो सरळ ऐकेचना
  मग अपर्णाशी सगळी चर्चा होऊन चुरापाव Vs चोरपांड्या पोस्ट करायची कल्पना आली
  या पूर्ण प्रक्रीयेत अपर्णाला जाम पीडलं, आज त्याने अमकं लिहिलंय मी त्याला तमकं उत्तर पाठवतोय असे मेल्स तीला सतत करायचो,
  तीही निमूट वाचून ok करायची, क्वचित बदल सुचवायची, कॉपी पेस्ट बंद करायचे सल्ले द्यायची.
  एवढंच काय हे सगळं मिटल्यावर त्याचा ब्लॉग बंद झाल्यावर माझी समजूतही तिने घातली.
  मी तुम्हा दोघांचे आभार मानतो. तुमच्यासारखे मित्र माझ्यासोबत होते म्हणून या चोरांना तोंड देणं शक्य झालं.
  हेच बळ प्रत्येक ब्लॉगलेखकामध्ये पेरण्याचं कार्य या ब्लॉगद्वारे हेरंबजींनी हाती घेतलंय.

  आपण Safe Blogging साठीही जागृती करायला हवी
  तुमच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा

  ReplyDelete
 36. प्रसाद,

  खूप आभार .. :-) .. एक विनंती, प्लीज जी वगैरे लावू नकोस नावापुढे. उगाच म्हातारं झाल्यासारखं वाटतं. :-)
  हो तेव्हा मीही आधी कन्फ्युजच झालो होतो कारण चोराचं नावही प्रसादच होतं. :)

  वा. अपर्णाकडून सल्ला घेतलास मग अजून काय हवं. :-)

  आणि आभार वगैरेही नाही मानलेस तरी चालेल.

  आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा आणि जिथे हे असले प्रकार दिसतील तेव्हा आणि तिथे लगेच त्यांच्याविरुद्ध आवाज उठवून हे असले प्रकार बंद केले पाहिजेत. पुन्हा असले काही प्रकार दिसले तर कळवच.. हा ब्लॉग त्याच्यासाठीच आहे.

  ReplyDelete
 37. अतिशय छान उपक्रम आहे !

  ReplyDelete
 38. http://marathi-emails.blogspot.com/ अजून एक चोरी. हा फनी टेलिफोनिक संवाद कौतुक शिरोडकरने लिहिला आहे. मी तशी कमेंट टाकली आहे. बघूयात प्रसिद्ध होते की नाही.

  ReplyDelete
 39. मी पण टाकली आहे प्रतिक्रिया. बघुया काय होतंय. माहिती करून दिल्याबद्दल आभार.

  ReplyDelete
 40. उत्तम उपक्रम, धन्यवाद!

  ReplyDelete
 41. गायत्री आभार.

  ReplyDelete
 42. Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

  ReplyDelete
 43. 1]mul ingraji lekh asel aani tyaacha maraathi lekh lihila aani tyaakhali mul ingraji lekhachi link dili tar tyala chori mhanata yeil kaay?
  2]Ekaacha vishay- ingrajit ekaane lihila nanatar dusaryane tyaach vishayavar marathi,hindit pan aankhi jaadaa mahiti deun lihila ,mul sagalya lekhachi link aapaly lekhat dili tar tyala chori mhanata yeil kaay?
  kripaya spashtiakaran karave hi namra vinanti.

  ReplyDelete
 44. नमस्कार सावधान.. नाही. माझ्या मते तरी यातला कुठलाही प्रकार म्हणजे चोरी नाही. सरसकट दुसऱ्या ब्लॉग वरील लिखाण मूळ लेखकाचं नाव न देता आणि मूळ लेखकाची परवानगी न घेता आपल्या ब्लॉगवर टाकणे ही माझ्या दृष्टीने चोरी..

  ReplyDelete
 45. Dhanyawad ! herambha Mahoday.
  Mi kaahi sanganak ya vishayatil tadnya naahi.Tyat sadya phirativar aahe US madhye.Tyamule mi jo sanganak vapartoy tyavar marathi lihu shakat naahi.kshamaswa!
  mala tumacha pahila lekh vachayacha hota mhanun "Bhag1" yavar klik kele tar phalatach kaahi tari ughadat hote. rahun gele. Aapan aapalya lekhakhali maagil lekhachi sampurn link dili tar chalel ase malaa vatate.Majhya sarakhya adanyala tyacha upayog hoil.

  ReplyDelete
 46. सावधानजी, त्या ब्लॉगलेखकाने तो लेख आता तिथून उडवला आहे त्यामुळे तो दुवा उघडत नाहीये.

  ReplyDelete
 47. halli self promotion baddal khup orada chalu aahe.
  haa kaay prakar asato?
  krupaya mahiti dyavi hi vinanti.

  ReplyDelete
 48. मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते.

  ReplyDelete
 49. प्रिय हेरंब,
  "पुन्हा चोरशील" या तुझ्या ब्लॉगवरचा आधुनीक चौर्यकर्मा वरचा लेख वाचला. कल्पना छान पण त्याहुन जास्त महत्वाच तुझी चोरीचा पाठपुरवा करण्यातली चिकाटी. म्तणुनच यावर तब्बल ५३ टीपण्या आल्यात. पण एक लक्षात येत की शेवटची टीपणी आहे ती २ ऑगष्ट २०१० ची. याचे दोन अर्थ निघतात - (१) तुझा ब्लॉग जास्त जणां पर्यंत पोहोचला नाही किंवा (२) आपल्या सारख्या बहुतेकांचे अर्थाजन ब्लॉगवरील लिखाणावर अवलंबुन नसल्याने आपला लेख किंवा लिखाण दुसर्‍या कोणी चोरल्याची तितकीशी ची्ड ये्त नसावी.
  याचा अर्थ तुझा उपक्रम कमी महत्वाचा आहे अस नाही तर हा ब्लॉग जास्त लोकांपर्यंत पोहोचुन चोरी करणार्‍या विरुध्दचा समुह कट्टा बनावा ही गरज वाटते.
  तुझ्या ब्लॉगवर पहीलीच प्रतिक्रिया कांचन कराई यांची आहे. त्यांच्या कडे आम्हा मुंबईकर ब्लॉगवाल्य़ांचा चांगला डेटा ( मराठीत माहितीचा स्त्रोत अस लिहीण्याची उर्मी खुप आली होती पण..... हा वेगळा विषय आहे तो नंतर कधितरी) आहे. त्यांनी जर आम्हा सगळ्यांना हया ब्लॉगची माहीती ( Link ) आमच्या आमच्या ब्लॉगवर प्रकाशीत करण्याच आवाहन केल तर तुला ( आपुलकीने एकेरीत लिहीतोय ) जास्त चांगला प्रतिसाद मिळेल अस मला वाटत. माझ्या परीने मी माझ्या ब्लॉगवर तुझ्या या चळचळीची माहिती व दुवा लवकरच देईन हीच माझी अल्पसी मदत.

  ReplyDelete
 50. http://marathi-indian.blogspot.com

  हा आणखी एक ब्लॉग ज्याची सुरुवातच मुळात चोरण्यापासून झाली आहे.

  त्याने माझा http://www.2know.in/2010/05/blog-post_23.html या पत्यावरील "मोबाईल इंटरनेट, गुगल मोबाईल" हा ब्लॉग चोरुन त्याच्या ब्लॉगची सुरुवात केली. चोरीचा दुवा - http://marathi-indian.blogspot.com/2010/07/blog-post.html

  मी खरं तर याकडे दुर्लक्ष केलेलं, पण तुमचा लेख वाचून काहीतरी करावं वाटलं. त्या ब्लॉगवरील कदाचीत सर्व ब्लॉग चोरले आहेत. उदाहरणार्थ माझ्या माहितेप्रमाणे हेमंत आठल्ये चा http://hemantathalye.wordpress.com/2010/07/28/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE/ "अप्सरा" हा ब्लॉग या इथे चोरण्यात आला आहे - http://marathi-indian.blogspot.com/2010/07/blog-post_3406.html

  याशिवाय इतरही अनेक चोरलेले ब्लॉग http://marathi-indian.blogspot.com या पत्यावर आहेत.

  ReplyDelete
 51. मी त्या ब्लॉगखाली कॉमेंट टाकली आहे. यशिवाय हेमंतलाही याबाबत सांगितलं आहे.

  ReplyDelete
 52. प्रिय मैत्रेय,

  मनःपूर्वक धन्यवाद.. खरंय. हे आधुनिक चौर्यकर्म दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्या ब्लॉगर्सनीच एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवला पाहिजे. अर्थात कांचन कराई या दृष्टीने आवश्यक तो पाठपुरावा करतच आहेत.

  आत्ताच तुमच्या ब्लॉगवर या ब्लॉगविषयीची पोस्ट वाचली. तिथेही प्रतिक्रिया देतोच. हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.

  ReplyDelete
 53. या ब्लॉग मागील कल्पना आवडली. मराठी कट्टा नावाची कुठलीशी साईट आहे तिथे पण बराचसा चोरबाजारातला माल मिळतो.

  ReplyDelete
 54. हेरंबदा ! ब्लॉगची संकल्पना अतिशय चांगली आहे.... अशा चोरांना रोखण्यासाठी सर्वात आधी गरज आहे ती ब्लॉगर्सच्या एकजूटीची.... ती या माध्यमातून साध्य होऊ शकेल....
  मागे मलाही एक कथेची चोरी सापडली होती... मी मूळ लेखिकेस कळवल्यावर...... त्यांनी त्या साइटच्या प्रशासनाकडे तक्रार केली..... त्यांनी ज्याने ती चोरी केली होती... त्याचा आयडी उडवला........ शुभेच्छा ! :)

  ReplyDelete
 55. रोहन, किरण आणि युनिक पोएट,

  प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.

  ReplyDelete
 56. मला नव्या चोऱ्या लिहायच्या आहेत इथे... :)

  ReplyDelete
 57. रोहणा :).. लिहून टाक :)

  ReplyDelete
 58. हेरंब
  कल्पना आवडली. अशी अशा करूया कि या उपक्रमामुळे चोरी आणि चोर या दोघांना ही आळा बसेल.

  ReplyDelete
 59. हि जागरुकता असायला हवी हे बरोबर आहे
  आपण त्यासाठी काही तरी नियोजन करू कि कोणी आपली नोंद कॉपी करू नये

  ReplyDelete
 60. धन्यवाद अभिजीत.

  ReplyDelete
 61. mazya bhavachi kavita ata fb chya sagalya pananwar firatey
  arthatch tya khali tyach nav nahi ani ya babat tyala mahiti nahi :(

  ReplyDelete
 62. Khup stutya upakram aahe. Amhi aapalyala asha chorya najares aalya tar kalwat jaau.

  ReplyDelete